नगर – सोलापूर मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर…*

 *नगर – सोलापूर मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर…*

*पंढरपूर , अक्कलकोट देवस्थाने येणार प्रकाशझोतात…*
देविदास गोरे….
रुईछत्तिशी – नगर – सोलापूर मार्गावरील वाळुंज येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून आठ दिवसात या मार्गावरील वाहतूक सुरळीत पणे चालू होणार आहे.नगर सोलापूर महामार्ग सध्या भरधाव वेगाने वाहत आहे.काही ठिकाणी सर्व्हिस रोड व पुलाचे कामे सुरू असल्याने मार्गावरील वाहतुकीस कधी अडथळा निर्माण होतो.वाळुंज येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले की रस्ता सुसाट पद्धतीने सुरू होणार आहे.नगर पासून करमाळा पर्यंत या मार्गावरून एकच रेल्वे उड्डाणपूल आढळून येतो.नगर – आष्टीसह भविष्यात दक्षिण भारताला जोडणारा रेल्वेमार्ग सोलापूर रस्ता पार करून जातो.सध्या याच पुलाचे काम सुरू असून बाकी मार्ग वेगाने सुरू आहे.चार दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी नगर शहरातील ०३ उड्डाणपुलाचे व नगर – सोलापूर मार्गाचे लोकार्पण केले.वाळूंज येथून जाणाऱ्या रिंग रोड रस्त्याचे काम देखील प्रगतीपथावर सुरू असून हा मार्ग देखील एक महिन्याच्या आत सुरू करण्यात येणार आहे.नगर – पुणे , नगर –  बीड , नगर – छ.संभाजीनगर , नगर – सोलापूर या जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग भविष्यात दक्षिण भारताशी सलग्न होणार आहे.चेन्नई – हैद्राबाद मार्ग देखील याच रस्त्यावरील बाह्यवळण मार्गावरून जातो.मार्गावर कोणत्याही प्रकारचा घाट नसल्याने अवजड मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची मोठी गर्दी रस्त्यावरून वाहत असते.अक्कलकोट , पंढरपूर , तुळजापूर ही देवस्थाने याच मार्गावर येत असल्याने राज्यातून भक्तांची देखील मोठी गर्दी मार्गावरून पहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *