लिंपणगांवमधील त्या वादाशी लंकेंचा काय संबंध ?

लिंपणगांवमधील त्या वादाशी लंकेंचा काय संबंध ? 
जगताप, भोस, शेलार, पाचपुते यांचा सवाल 
तो वाद स्थानिक तरूणांचा
 
श्रीगोंदे :  प्रतिनिधी 
      नीलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रा लिंपणगांव येथे पोहचल्यानंतर लंके तसेच इतरांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर तिथे आयोजित करण्यात आलेला जेवणाचा कार्यक्रम उरकत येत असताना तरूणांच्या दोन गटामध्ये स्थानिक प्रश्‍नावरून वाद झाला. त्या वादाशी लंके यांचा काडीचाही संबंध नसल्याचे मा. आ. राहुल जगताप, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार व साजन पाचपुते यांनी सांगितले. 
     शुक्रवारी दुपारी हा वाद झाल्यानंतर या वादाचे व्हिडीओ व्हायरल करून लंके यांना सभा न घेताच लिंपणगांवमधून काढता पाय घ्यावा लागल्याच्या खोटया बातम्या विरोधकांकडून जाणीवपुर्वक पसरविण्यात आल्या. त्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर नीलेश लंके यांनी १ एप्रिलपासून मतदारसंघात स्वाभीमान जनसंवाद यात्रा सुरू केली असून मोहटादेवी गटावरून सुरू झालेल्या या यात्रेस तालुक्या तालुक्यांमध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तसाच प्रतिसाद श्रीगोंदे तालुक्यातील गावागावांमध्येही मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून लंके यांची ही यात्रा बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे षडयंत्र रचले जात असल्याचे सांगण्यात आले. 
       तिसगांव येथे आ. नीलेश लंके हे व्यापारी तसेच सामान्य माणसांच्या गाठी भेटी घेत असतानाचा व्हीडीओ व्हायरल करून लंके यांच्या कॉर्नर सभेला गर्दी न जमल्याने कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त करून ते निघून गेल्याच्या खोटया बातम्या पसरविण्यात आल्या. त्यानंतर मात्र तिसगांवचे सरपंच तसेच इतर ज्येष्ठांनी खुलासा केल्यानंतर विरोधक चांगलेच तोंडघशी पडले. या अपमानाचा बदला लंके यांना सत्तर टक्के मते देऊन घेणार असल्याची प्रतिज्ञा तिसगांवकरांनी घेतली ही घटनाही ताजी असताना विरोधकांनी लंके यांना बदमान करण्यासाठी ही दुसरी चाल खेळली तिलाही यश आले नसल्याचे जगताप, भोस, शेलार, पाचपुते यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *