डाळ , गूळ वाटणारा लोकप्रतिनिधी नाही तर समाजाच्या समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी निवडून द्या – निलेश लंके.

 डाळ , गूळ वाटणारा लोकप्रतिनिधी नाही तर समाजाच्या समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी निवडून द्या – निलेश लंके.

शेतकऱ्यांच्या पिकाला दुधाला भाव नाही यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला

देविदास गोरे
रुईछत्तिशी – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा आज वाळकी गटात पार पडली. रुईछत्तिशी येथे ही यात्रा आली असता मोठा प्रतिसाद पहायला मिळाला.जनतेने उत्स्फूर्तपणे लंके यांना पाठिंबा दिला.गेल्या अनेक दिवसांपासून भाजपने केलेला विकास मतदारसंघात मांडला जात आहे पण जनतेला हा विकास कधी दिसला नाही. डाळ , गूळ वाटणारा लोकप्रतिनिधी नाही तर समाजाच्या समस्या विधिमंडळात मांडणारा लोकप्रतिनिधी निवडून द्या.एकदा विश्वास टाकून बघा तुमचा विश्वास तडा जाऊ देणार नाही असे आवाहन लंके यांनी करताच जनतेने टाळ्यांचा कडकडाट केला. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लोकसभेची निवडणूक आहे.गेल्या २५ वर्षात जनतेने कधी ही निवडणूक हाती घेतली नाही पण ही निवडणूक जनतेने उत्स्फूर्तपणे हाती घेतल्याचे पहायला मिळत आहे.निलेश लंके यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन माजी आमदार राहुल जगताप यांनी केले.वाळकी गटातील अनेक समस्या भाजपने मार्गी लावल्या नाहीत.लोकांना वेठीस धरून आणि गुन्हेगारी प्रवृत्तीने वागून विखे आणि कर्डिले यांनी दहशत निर्माण केली.जिल्हा बँकेच्या माध्यमातून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केला.
       सत्तेत असताना यांनी कोणतीही ठोस विकासाची कामे केली नाहीत असा आरोप माजी जिल्हा परीषद सदस्य संदेश कार्ले यांनी केला.गावातील मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. माजी | जिल्हा परीषद सदस्य बाळासाहेब हराळ, शरद झोडगे शिवसेना तालुका प्रमुख  राजेंद्र भगत, प्रकाश कुलट, किसन लोटके , संदीप कर्डिले , रोहिदास कर्डिले , नगरसेवक योगीराज गाडे, पंचायत समिती माजी सभापती रामदास भोर , विलास लोखंडे, तालुका  युवा सेना प्रमुख प्रविण गोरे , बिभीषण सपाटे तसेच काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.भाजपने कोणत्याही प्रकारची विकास कामे केली नाहीत. सत्ता असताना देखील विखे यांनी कोणत्याही प्रकारचे काम मतदारसंघात केले नाही. शेतकऱ्यांचा पिकाला भाव नाही.दुधाला भाव नाही अशी प्रतिक्रिया लोकांनी मोठ्याने बोलून दाखवली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *