कोरेगाव शाळेचे विविध स्पर्धा परिक्षांत उल्लेखनीय यश*
श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव जिल्हा परिषद शाळेच्या नावलौकिकाप्रमाणे यावर्षीच्या नवोदय परीक्षेत तसेच विविध स्पर्धा परिक्षेमध्ये शाळेने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. शालेय स्तरावर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचा पाया समजल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर),आॅल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा क्रमांक १ मध्ये अजमेर (राजस्थान)येथे व आॅल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा क्रमांक २ मध्ये सातारा (महाराष्ट्र)येथे कोरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विश्वजीत अरुण परभणे या विद्यार्थ्यांची निवड झाली. तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या मिशन आरंभ 2024 या परीक्षेतही शाळेने उल्लेखनीय यश प्राप्त केले या परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आदेश संदीप म्हस्के (इ.7 वी) हा 19 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला तसेच तालुका गुणवत्ता यादीत अभिनव धनंजय साबळे,आयुष पोपट इंगावले,सई श्रीकांत पवार व आर्यन दयानंद रणसिंग ( इ.4 थी) व प्रथमेश माणिक साबळे ( इ.7 वी ) या विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले. तसेच मंथन पब्लिकेशन व लक्ष्यवेध पब्लिकेशन या परीक्षेतही शाळेने अभूतपूर्व यश संपादन केले. याकामी वर्गशिक्षक श्री संदीप झरेकर,श्री अरुण परभणे व श्री स्वप्नील बोरुडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. नवोदय विद्यालय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास टाकळी ढोकेश्वर स्थित जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे सीबीएससी पॅटर्नचे मोफत शिक्षण मिळणार आहे.यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष मगर सहकारी शिक्षिका श्रीम सुनिता भोसले यांचेही सहकार्य लाभले.या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री अनिल शिंदे,शिक्षण विस्तार अधिकारी श्री गांगड,केंद्रप्रमुख श्री उधार व कोरेगाव येथील ग्रामस्थ व पालक वर्गातून
अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.