निंबळक चौफुला ते एम. आय.डी.सी. रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा
अहमदनगर – गेल्या सात वर्षापासून निंबळक बायपास चौक ते एम आय डी सी या शंभर मिटर रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा मा. पंचायत समिती उप सभापती डॉ दिलीप पवार यांनी केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता क्रॉकंटीकरण केला. या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आज ग्रामस्थांनी केला.
निंबळक चौफुला ते एम.आय.डी.सी. हा रस्ता संपुर्णपणे उखडला होता.नगर शहर व एम.आय.डी.सी. यांना जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावरुन दररोज हजारो वाहनांची रहदारी होत असते. या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात सा.बां. विभाग अ.नगर यांचेकडे डॉ.पवार यांनी सात वर्ष पाठपुरावा केला. हा रस्ता एम. आय.डी. सी. कडे हस्तांतरीत केल्याचे सांगितले जायचे व एम.आय.डी.सी. कडे पाठपुरावा केला असता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे अशी टोलवा टोलवी सुरु होती. दोन्ही विभाग ह्या रस्त्याची दुरुस्ती आमच्याकडे नाही असे सांगून वेळ काढूपणा करत होते .या दोन विभागांच्या वादात रस्ता बेवारस झाला असुन याची दुरुस्ती कोण करणार असा प्रश्न होता. ह्या रस्त्याची दुरुस्ती होत नव्हती आणि खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.हा रस्ता नगर शहर व एम आय डी सी ला जोड़णारा असल्याने इतर शहरातुन तसेच नगर पारनेर तालुक्यातील वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. हजारो कामगार तसेच विद्यार्थी ह्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आणि अनेक अपघात ह्या ठिकाणी होत होते. डॉ.पवार व ग्रामस्थांनी तब्बल नउ वेळा आंदोलन केले त्यात ठिय्या आंदोलन रास्ता रोको घंटा नाद करण्याची वेळ ग्रामस्थावर आली होती. अखेर
सा.बां.विभागाचे उपविभागीय अधिकारी के.एम.डोंगरे व शाखा अभियंता एस.एस.चव्हाण यांनी विशेष प्रयत्न करून हा रस्ता क्रॉकटीकरण केला. ह्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आज सकाळी बारा वाजता करण्यात आला यावेळी मा.उपसभापती डॉ दिलीप पवार,
बी.डी. कोतकर, दत्तात्रय दिवटे, निलेश पाडळे,अतुल कुलट, भाऊसाहेब शिंदे, जान महम्मद सय्यद, विजय तांबे, देवीदास कुलट, पिनु तांबे, सुरेश गाढे, संदिप गेरगे बापु गेरंगे उपस्थित होते.