अतिवृष्टीमुळे फळबागाच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा –

आहिल्यानगर – अहमदनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या कांदा, डाळिंब, संत्रा, चिकू आदि पिकाच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावी याबाबतचे निवेदन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना नगर तालुका विकास आघाडीच्या वतीने देण्यात आले .पंचनामे झाले नाही तर नगर तालुका विकास आघाडीने आंदोलन करण्याचा इशारा दिला

मे 2025 या महिन्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. सदर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डाळिंबाची फळे गळती मोठ्या प्रमाणात झाली.झाडे उनमळून पडलेले आहेत.. संत्रा फळांना वाव मिळाला नसल्यामुळे फळधारणा झाली नाही. तसेच चिकूचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा कांदा काढून ठेवला होता तो शेतामध्ये तसाच पडून आहे.व जो कांदा काढला नाही तो आता काढता येणार नाही. या सर्व नुकसानीचा पंचनामा होऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत घेणे गरजेचे आहे. याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी दिलेल्या सूचनेची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. याबाबत जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार, एसडीओ यांना त्वरित पंचनामे करण्याबाबत आपण आपल्या स्तरावरून आदेश द्यावेत. जर पंचनामे झाले नाही तर नगर तालुका विकास आघाडी व शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, माजी पंचायत समिती सभापती रामदास भोर,संदीप गुंड,पोपटराव निमसे, गणेश तोडमल, गोरक्षनाथ काळे,अजय लामखडे, विकास शेडाळे, राजाराम धामणे, विक्रम कासार, संजय कोतकर, शिवनाथ कोतकर, सुनील भापकर,मधुकर म्हस्के, बाप्पू अमृते सह शेतकरी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
ज्या ज्या भागात अतिकष्टीमुळे शेतीमालाची नुकसान झाले आहेत त्या सर्व शेतकऱ्याच्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कृषि विभागाला दिले आहे.पंचनामे बाबत हलगर्जी झाल्यास संबधीत कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. लवकरात लवकर पंचनामे होतील
ना.राधाकृष्ण विखे पाटील
पालकमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *