पुणे यशदा येथे राज्यातील महिला सरपंचाचे तीन दिवशीय शिबीर संपन्न.* 

(अक्कलकोट मधून गोगांव च्या सरपंच वनिता सुरवसे यांची उपस्तिथी.)

पुणे यशदा येथे राज्यातील महिला सरपंचाचे तीन दिवशीय शिबीर संपन्न.* 

(अक्कलकोट मधून गोगांव च्या सरपंच वनिता सुरवसे यांची उपस्तिथी.)

सोलापूर प्रतिनिधी :  ग्राम विकास मंत्रालय,भारत सरकार यांनी सुचित केल्यानुसार ग्रामीण विकासाच्या अनुषंगाने तालुक्यातील कार्यक्षम महिला सरपंचासाठी विशेष कार्यक्रम व तीन दिवसीय निवासी  प्रशिक्षण शिबिर यशदा पुणे यांच्यामार्फत सहा ते आठ मार्च 2025 रोजी बाणेर पुणे येथे संपन्न झाले.

 या कार्यक्रमासाठी राज्यातील विविध तालुक्यातील यशस्वी महिला सरपंचांचा सहभाग होता, अक्कलकोट तालुक्यामधुन गोगाव च्या सरपंच सौ वनिता मधुकर सुरवसे यांनी शिबिरांमध्ये  सहभाग घेतला, आणि येणाऱ्या काळात अशा प्रशिक्षणात सर्व सरपंचांनी सहभागी व्हावे असे आवाहनही केले. 

 ग्रामीण विकासाच्या संबंधित विविध योजनांच्या अंमलबजावणी मध्ये महिलांचा सहभाग कसा वाढेल, महिला सक्षमीकरण याबद्दल उत्तम मार्गदर्शन, शाश्वत विकासाचे ध्येय, गावगाडा चालवत असताना येणाऱ्या अडचणी अशा अनेक प्रश्नांचे उत्तर अशा प्रशिक्षणामधून मिळत असतात, मी माझी नसून माझ्या गावची आहे, माझे गावच माझे आहे हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एखाद्या सरपंचाने गावासाठी निधी आणून विकास करायचा ठरवला तर शंभर टक्के शास्वत विकास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण सरपंच हाच गावच्या विकासाचा कणा असतो त्यामुळे सरपंचांनी मनात घेतले तर गाव सुजलाम सुफलाम व्हायला उशीर लागत नाही, अडथळे करणारे विरोधक प्रचंड असतात पण त्यांना काना डोळा करून आपण आपल्या विकासाच्या ध्येयाचे उद्दिष्ट सतत चालू ठेवावं असे प्रशिक्षण समारोप वेळी  सरपंच वनिता सुरवसे यांनी सर्व सरपंचांना मार्गदर्शन केले, आणि विविध तालुक्यातील आलेल्या सर्व सरपंच, प्रशिक्षण आयोजन केलेल्या यशदा पुणे यांचे आणि अक्कलकोट गटविकास अधिकारी यांचे मनस्वी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *