नेप्ती ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी एकनाथ जपकर
आहिल्यानगर – नेप्ती ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी एकनाथ आसाराम जपकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याची माहीती पिठासन अधिकारी सरपंच सविता संजय जपकर यांनी दिली.
नेप्ती ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवड आज दि.११ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. माजी उपसरपंच अनिता दादू चौघुले यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे हे पद रिक्त राहिले. या पदासाठी आज निवड प्रकिया पार पडली एकनाथ जपकर यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने हि निवड बिनविरोध झाली. उपसरपंच पदाची संधी सार्वांना मिळावी म्हणून प्रत्येक वर्षी हि निवड केली जाते. यावेळी माजी सरपंच विठ्ठल जपकर,सरपंच सविता संजय जपकर, माजी उपसरपंच संजय आसाराम जपकर, ग्रामविकास अधिकारी लालभाई शेख ,माजी उपसरपंच आनिता चौघुले, सोनाली जपकर, विमल होळकर, फारुक सय्यद, संभाजी गडाख,संजय अशोक जपकर, बंडू जपकर, दादू चौगुले, बाबासाहेब होळकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक वसंत पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवाजी होळकर, माजी सरपंच सुधाकर कदम , नंदू जाधव, जालिंदर शिंदे , सोसायटी अध्यक्ष विलास जपकर, मल्हारी कांडेकर, राजेंद्र जपकर, अंबादास जपकर,अशोक जपकर, राजाराम जपकर, भाऊसाहेब होळकर, उमर सय्यद, बाबू होळकर, सुरेश कदम, सादिक पवार, मच्छिंद्र होळकर, रामदास फुले, ज्ञानेश्वर जपकर, दिपक गायकवाड, कारभारी जपकर, देवा होले,माजी सरपंच दिलीप होळकर, सोमनाथ जपकर, अतुल जपकर, निखिल जपकर, देवराम जपकर, राजेंद्र जपकर, भैरवनाथ जपकर, जमीर सय्यद,जावेद सय्यद, नितीन कदम, शिवाजी गाडेकर, राजू गाडेकर, भास्कर जपकर, बाबासाहेब जपकर, मच्छिंद्र जपकर, सहादू जपकर, केशव जपकर, दादाभाऊ जपकर, राजेंद्र होळकर, दत्ता कदम,लक्ष्मण कांडेकर, यावेळी उपस्थित होते. यावेळी जपकर म्हणाले उपसरपंच पदाच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना सर्व सामन्य नागरिका पर्यत पोहचविल्या जातील त्याचा लाभ मिळून दिला जाईल. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
नेप्ती ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी एकनाथ जपकर
