हिवरे बाजारच्या डोंगराला आग- ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे नियंत्रणात
नगर प्रतिनिधी | आदर्शगाव हिवरेबाजार येथील डोंगराला दिनांक २३ फेबुवारी २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता आग लागली. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरे बाजारमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित असल्याने तरुण व ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले त्यामुळे काही मिनिटातच ग्रामस्थ व तरुण मंडळ तसेच ग्रामवन समितीचे सदस्य यांच्या अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.


