*म्हस्के विद्यालयात प्रजासत्ताकदिन साजरा*
आहिल्यानगर -जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित काकासाहेब म्हस्के प्राथ. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागापूर या ठिकाणी ७६ वा प्रजासत्ताकदिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ.श्री.सागर बोरुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सय्यद शरफुद्दीन अध्यक्षस्थानी हे होते. प्रमुख अतिथी श्रीमती साठे ताई,माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयच्या प्राचार्या. शितल बांगर, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा धामणे हे उपस्थित होते. विद्यालयाच्या परिसरातून शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषणे, देशभक्ती गितांचे गायन करून स्वातंत्र्यसेनानींच्या कार्याला उजाळा दिला. क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू,शासकीय चित्रकला,
शालाबाह्य स्पर्धा परीक्षेत यश मिळवणा-या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन .नितीन म्हस्के, आभार उज्वला राहिंज यांनी मानले.