कर्नल राजी मथ्यू एम.आय.आर.सी.
समृद्ध गाव घडविण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज:-
कर्नल राजी मथ्यू एम.आय.आर.सी.
हिवरे बाजार – समृद्ध गाव घडविण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असून हिवरे बाजार मध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांच्या रूपाने तुम्हाला मिळाली आहे असे प्रतिपादन एमआयआरसीचे कर्नल राजी मथ्यू यांनी केले
आदर्शगाव हिवरेबाजार येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल राजी मथ्यू एम.आय.आर.सी.हे उपस्थित होते.यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व यशवंत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एन.सी.सी.संचलन,सामुहिक गीते व भाषणे तसेच विविध गुणप्रदर्शन सादर केले. यावेळी मथ्यू म्हणाल विद्यार्थ्यांमध्ये असणारी शिस्तप्रीयता ,नम्रता व संस्कार हे खूप म्हत्वाचे असून भविष्यात तुम्ही सर्व विद्यार्थी जगभराच्या कानाकोपऱ्यात नोकरीसाठी बाहेर असताल. मेरा भविष्य कैसा है मेरा भविष्य किसके हाथ, में है ये आप नही जानते आप भविष्य में उन्नती करेंगे दुनिया के कोने कोने मे होंगे असे उद्गार त्यांनी काढले एनसीसी छात्रांनी केलेल्या उत्कृष्ट संचलनाचे कौतुक केले एनसीसीची परेड अतिशय जोशपूर्ण झाली त्यामुळे मी खूपच भारावून गेलो.
जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे म्हणाले हिवरे बाजारचे नागरिक व विद्यार्थी खूप नशीबवान आहात .पद्मश्री पोपटराव पवार यांच्या रूपाने हिवरे बाजारमध्ये झालेला विकास संपूर्ण देशभर गावाचा लौकिक आहे.संपूर्ण राज्यात ग्रामीण विकासाचे स्वप्न हिवरे बाजारच्या रूपाने विकासकामे होऊन विकसित व सशक्त भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजचे आहे.त्यानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरद मगर यांनी आपल्या भाषणात सांगितले हिवरे बाजारचे काम हे दीपस्तंभाप्रमाणे आहे.हिवरे बाजार गावात प्रवेश केल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर सकारात्मक उर्जा मिळते.राज्यात हिवरे बाजारसारखी खेडी विकसित झाली पाहिजेत पद्मश्री पोपटराव पवार चांगला विचार करून विकासाची संकल्पना पुढे घेऊन जातात हे इतर गावासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.याप्रसंगी मेजर मोहमंद रफी ,नाईक रफिकुल शेख,लोकेंदर सिंग, हिवरेबाजारच्या सरपंच सौ. विमलताई ठाणगे,चेअरमन छबुराव ठाणगे, व्हा.चेअरमन रामभाऊ चत्तर, हरिभाऊ ठाणगे , बाबासाहेब गुंजाळ, दामोदर ठाणगे, अर्जुन पवार, एस टी पादीर, रोहिदास पादिर, सहदेव पवार, माजी सैनिक मंगेश ठाणगे, राजू ठाणगे तसेच एनसीसी छात्र, शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .