हिवरे बाजारची कुस्तीची परंपरा प्रेरणादायी :- आमदार संग्रामभैय्या जगताप
हिवरे बाजार:- आज दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी अहिल्यानगरचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे निमंत्रण पद्मश्री पोपटराव पवार यांना देण्यासाठी आदर्श गाव हिवरे बाजारला भेट दिली.
याप्रसंगी बोलताना आमदार जगताप म्हणाले हिवरे बाजारची कुस्ती क्षेत्रातील मोठा परंपरा असून एकेकाळी लालमातीतील मल्लांचे गाव म्हणून हिवरे बाजार प्रसिद्ध होते.पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज ग्रामविकासाचे तीर्थक्षेत्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे.म्हणूनच आम्ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते ठेवले आहे असेही त्यांनी सांगितले.कुस्तीमुळे पवार व जगताप कुटुंबियांचे ऋणानुबंध जुने आहेत.
हिवरे बाजार येथे अमृतमहोत्सवी प्रवेशद्वाराजवळ त्यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि ग्रामस्थांच्या वतीने फेटा बांधून व शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी बाळासाहेब पवार ,कुशाभाऊ ठाणगे,पोपट बोरकर,सुमित पादीर व ग्रामस्थ उपस्थित होते.


