चांगल्या आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळावेत : जिल्हा क्रीडाधिकारी आमसिद्ध सोलंकर,
स्लग – देहरे येथे विभागीय डॉज बॉल स्पर्धांचे आयोजन
अहिल्यानगर :- आयुष्यात चांगल्या आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळावेत
असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलंकर यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर आणि नवभारत विद्यालय देहरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय शालेय डॉजबॉल स्पर्धाचे आयोजन मंगळवारी (दि. १०)देहरे (ता. नगर ) येथे करण्यात आले, यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
विभागीय स्तरीय स्पर्धेचे उदघाट्न
जिल्हा मराठा संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दीपकराव दरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा कार्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव धन्यकुमार हराळ, जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार शितोळे, नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, मा.पं.सदस्य व्ही.डी. काळे, पारनेर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष बापूसाहेब होळकर,
सरपंच नंदाताई भगत, उपसरपंच दीपकराव जाधव, से. सो.अध्यक्ष ताराबाई करंडे, उपाध्यक्ष भानुदास भगत, पंढरीनाथ लांडगे, सुरेश काका लांडगे, सुभाष काळे, विजय लांडगे गोविंद काळे, दीपक करंडे यासह देहरे ग्रामपंचायत सोसायटी आजी माजी पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून शिक्षणाबरोबरच चांगल्या प्रकारचे खेळाडू घडावेत यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य शिरीष टेकाडे यांनी खेळाडू स्पर्धकांच्या जेवणाची व्यवस्था केली तसेच देहरे गावचे माजी सरपंच संजय लांडगे यांनीही विद्यार्थी स्पर्धकांच्या जेवणासाठी पाच हजार रुपये दिले.
प्रस्ताविकातून प्राचार्य शिरीष टेकडे यांनी स्पर्धक खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक कैलास मोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवभारत विद्यालयातील क्रीडा शिक्षक चंद्रकांत सरोदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अशोक लष्कर, रोहिणी पवार यांनी तर आभार अमरजा कांडेकर यांनी व्यक्त केले.
चौकट :
२८ संघांनी घेतला सहभाग
– देहरे येथे मंगळवारी पार पडलेल्या विभागीय पातळीवरील डॉजबॉल 28 संघांनी सहभाग नोंदवला. यामध्ये अहिल्यानगर, पुणे, सोलापूर येथील ग्रामीण व शहरी संघातील 17 व 19 वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.