अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत बारागाव नांदूर येथील शेकडो नागरिकांचा भाजपामध्ये प्रवेश
नागरिकांनी तनपुरेंच्या नाकर्तेपणामुळे अक्षरशः त्यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली : अक्षय कर्डिले
नगर : राहुरी तालुक्यामध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने रहात असून त्यांचे प्रश्न लोकप्रतिनिधीने कधीही समजून घेतले नाही. ते अडीच वर्ष आदिवासी खात्याचे मंत्री असून देखील शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत घेऊन गेले नाही. आजही आदिवासी बांधव विविध समस्यांना सामोरे जात आहे. स्वतःचे अपयश व नाकर्तेपणा झाकण्यासाठी आमच्यावर कोठे नाटे आरोप करत फिरत आहे. मतदारसंघातील गावोगावी नागरिकांनी त्यांच्या सभेकडे पाठ फिरवल्यामुळे व हजारो युवक नागरिक दररोज भाजपमध्ये प्रवेश करीत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते नैराश्यातून आरोप करत सहानुभूतीचा आसरा घेण्याचा प्रयत्न चालू आहे मात्र जनता आता हुशार झाली असून काय खरं काय खोटं हे माहित आहे राज्य मंत्रिमंडळातील सहा खात्याच्या कारभाराबरोबर महत्त्वाचे ऊर्जा खाते असून देखील मतदारसंघातील विजेचे प्रश्न मार्गी लावू शकले नाही. आज त्यांच्यावर अंधारात सभा घेण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी तनपुरेंच्या नाकर्तेपणामुळे अक्षरशः त्यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे आता ते नागरीकांना फोनवर दहशत व दमबाजी करत आहे. आमच्यावर खोटे नाटे आरोप करत फिरत आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवीत असून जनता ही त्यामध्ये सामील झाली आहे. बारागाव नांदूर येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले.
चौकट : चांगले काम करणाऱ्याच्या पाठीमागे जनता उभी राहत असते. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी गेली तीस वर्ष जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचारानिमित्त फिरत असताना नागरिकांकडून मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. जनतेलाही आता माहीत झाले आहे की कामाचा माणूस कोण आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले सकाळी सात वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत जनतेच्या सुखदुःखात सामील होत ऋणानुबंध जोपासण्याचे काम केले जात आहे. जनतेचे आमच्यावर असलेले प्रेम पाहून आमचा विजय निश्चित झाला असल्याचे मत युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केले.


