संदेश कार्ले यांचा राजकीय संघर्ष

संदेश कार्ले याचा राजकीय खडतर प्रवास

राजकारणाच्या माध्यमातून केलेली विकासकामे

कार्ले संदेश तुकाराम मनोगत…

प्रिय माता बंधू भगिनींनो, मी संदेश तुकाराम कार्ले माझे मनोगत आपणापर्यंत पोहचवत आहे.

आपण राजकारणाला चांगले समजतो का वाईट? मी तर वाईटच समजत होतो. परंतु  चाणक्याच्या म्हणण्यानुसार  चांगल्या माणसाने राजकारण न करणे म्हणजे मुर्खाच्या हातात सत्ता देणे होय’, म्हणून मी राजकारणात भाग घेण्याचे ठरवले मी २००६-०७ मध्ये जिल्हा परिषद निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेना व आघाडीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला व आपल्या सर्वाच्या आशिर्वादाने भी निवडूनही आलो हा माझा राजकीय जन्म होय

निवडणूकी नंतर माझ्या मनात राजकारणाचा असलेला तिरस्कार डावलून काम  करण्याची  उर्मी आली होती. कारण जनतेने त्यावेळच्या  नगर तालुक्यातील लोकांच्या केलेल्या मोठ्या प्रेमाच्या वर्षावामुळे माझे काहीही कर्तृत्य नसतांनाही मायबाप जनता जनार्धनाने माझे वर खुप मोठा विश्वास दाखवला होता, त्याची जाणिच सदैव माझे मनात होती, आजही आहे व यापुढेही राहील म्हणून नेत्यांच्या शिकवणीने व आई- वडिल, शिक्षकांच्या संस्कारामुळे राजकारणात मनापासुन चांगले काम करण्याचे ठरविले.

मी काम करताना प्रामुख्याने शिक्षण, शेतकरी व ग्रामविकास या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रीत केले. शिक्षणात काम करताना तालुक्यातील शाळेच्या जुन्या इमारती नव्या करण्यावर भर दिला. कामरगांव गावातील शाळा खोली जीला दोन इंचाची फट असतानाही मी देऊ शकत नव्हतो. त्यावरुन अभ्यासाने मी षटकोनी खोल्या न बांधता सरळ चौकोणी बांधने व मंजूर करण्यासाठी अतिरिक्त ऐवजी मोडकळीस आलेल्या शाळा खोल्याही नविन बांधणेस जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळवली व सर्व शाळा खोल्या नविन केल्या तसेच शालेचे आनंददायी वातावरण निर्माण करण्यास जनतेच्या वतीने मदत झाली.

आज नगर तालुक्यातील काही अपवाद वगळता बहुतेक सर्व शाळा खोल्या नविन करण्यात आपण सर्वाच्या नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या सहकायनि यशस्वीही झालो. तालुक्यातील जवळजवळ १४० ते १५० प्राथमिक शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला मी उपस्थित राहीलो व आपल्या ग्रामिण भागास जनतेच्या सहभागाची शिक्षणाची चळवळ शिक्षक, शाला यावस्थापन समिती पालक पदाधिकारी व या सर्वाच्या सहकायनि सुरु झाली. आज रोजी तालुक्यातील ६७ शांळा ना ISO मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यार्थी संख्येत झालेली वाढ है सर्वाच्या एकत्रित प्रयत्नाचे व माझे उद्दिष्टांचे फळ आहे असे वाटते

शेतकरी हा तर जगाचा पोशिंदाच, आज शेतकन्यांची काय अवस्था आहे हे मला आपणांस सांगण्याची आवश्यकता नाही अवेळी  पडणारा पाऊना, पाणी टंचाई, विजेची टंचाई, लहरी हवामान यातुन मिळवलेले उत्पादन, त्यासही उत्पादन खर्चावाआधारीत भाव मिळेल याची शाश्वती नाही, म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केले, शेतीवर काम करताना शेतकन्यांना आचानक कमी होणारे कांद्याचे भाव या विषयावर मोठा संघर्ष व आंदोलन करताना एकदा मला मारहाणही झाली. ती मी सहन केली. कारण मनात असलेली इच्छा शक्ती शेतक -या ना  कांद गोणीचे पैसे मिळावे असा कायदा होता यांची अंमलबजावणी करावी म्हणून ही मोठे आंदोलने केली शेवटी एका संघर्षांतुन सरकारने तो कायदा अंमलबजावणी ऐवजी रद्द केला. त्या आंदोलनाने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले, व त्या कारणाने सरकारने माझ्यावर तडीपारची कार्यवाही करण्याची तयारीही केली होती.

तालुक्यात ग्रामिण जनतेच्या विकासासाठी सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या योजना पंचायत समितीच्या माध्यमातून पारदर्शीपणे व प्रभावीपणे राबविल्या सार्वजनिक कामात तेरावा विक्तआयोग, चौदावा वित्त आयोग, (बी. आर. जी. एफ.) मागास क्षेत्र अनुदान निधी, दलित वस्ती जनसुविधा, पंचायत समिती सेस या योजनाचा प्रभावी उपयोग केला.

वयक्तिक योजनांमध्ये इंदिरा आवास योजना घरकुले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना मधून  शौचालय व विहीरी, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालय, समाज कल्याण विभागाअंर्तगत शिलाई मशिन, महिला बालकल्याण विभागातील सायकल तसेच इतर योजना प्रभावीपणे राबविले आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा प्रयत्न केला

शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी म्हणून आपण चिंचोडी पाटील येथील पाणी पुरवठा योजनेला केलेले सोलर हे शेतकयांना दिवसा वीज मिळण्याचे उत्तम उदाहरण गेल्या तीन वर्षांपासून एकही रुपया खर्च न करता चालु आहे. यावरुन मी शेतकन्यांना दिवसा वीज पुरून रात्री पाणी भरण्याचे कष्ट कमी करू शकतो

शेतकन्यांसाठी विजेच्या संदर्भातही विद्युत वितरण कंपनीवर शेतकयांच्यावतीने छोटे-मोठे गेट बंद आंदोलन अधिकाऱ्याना घेराव खुर्चा बाहेर घेणे असे अनेक आंदोलने करून शेतकन्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पिकांची चुकीची आनेवारी या मुळे शेतकऱ्यानान मिळणान  पीक विमा या संदर्भात जेष्ठांचे मार्गदर्शन घेवून अधिकायांबरोबर काम केले. शेतीसाठी विविध ठिकाणी बंधाऱ्याची कामे, पाझर तलाव  दुरुस्तीची व शेतकयांच्या पिकाला हमीभाव (M.S.P.) मिळण्याकरीता मी शेअर मार्केट प्रमाणे कृषी निर्देशकाची कल्पना राबविल्यास शेतकन्यांचे कमी भाव होण्यापासून नुकसान होणार नाही. उदा. कांदा, दूध हे शेतकयांचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न आहे त्यामुळे त्याना व स्थिर वाजवी बाजारभाव आवश्यक आहे व ते सक्षमपणे करु शकतो असा विश्वास आहे. शेतीमालासाठी हमी भाव यासाठी खूप मनापासून प्रामाणिक प्रयत्न केला व सदैव करणार आहे

सरकारी पेन्शन धारकांना वेळेवर न मिळणारी पेन्शन त्यांची बैंकेत होणारी अवहेलना यासाठी लवकर पेन्शन मिळावी म्हणून जिल्हा परिषदमध्येही आंदोलन करुन त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याच प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, या. खासदार साहेबांच्या होणाऱ्या दक्षता स नियत्रण सभांमध्ये सातत्याने सर्वसामान्यांच्या वतीने आवाज उठविला. आपल्या आशिर्वादाने जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये दर्जेदार साहित्यासाठी मोठा संघर्ष केला. व दर्जेदार साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले.

या वर्षात उल्लेखनीय काम मागील सलग ३. ते ४ वर्षांत असलेला दुष्काळात पंचायत समितीमधुन जिल्हया सर्वात जास्त मंजूर टैंकरच्या ट्रिपा करणारा आपला तालुका आहे. मंजुर होणारे टैंकर व त्याची भरण्याची सोय त्यासाठी उद्‌भव पाणी भरण्याच्या ठिकाणी स्वतः अधिकान्यांसोबत पाहणी केली पूर्णवेळ मनापासुन स्वतः लक्ष देऊल जि.प. पं.सं सदस्य नेतेमंडळी जनतेच्या सहकार्यात केली, पूर्वी वारंवार बंद पडणारी घोसपुरी योजना व्यवस्थित चालु शकते हे सलग आठ महिने रात्र दिवस न पाहता अगदी पहाटे ४ पर्यंत सर्वाच्या सहकार्यनि काम केले व सदर योजनेत आज रोजी सुमारे ११५ लाख रुपये बैंक बॅलन्समध्ये आली, नियमित विजबिल व कामगाराना वेळेवर पगार देणारी दुर्मिळ अशी घोसपुरी पाणी पुरवठा समिती आहे की जी आज नफ्यात आहे, वाया जाणारे पाणी शेतक-यांना देऊन त्यांच्या फळबागा जगल्याने आ४हास आनंद होत आहे. घोसपुरी योजनेच्या यशामध्ये लाभार्थी, सर्व गावाचे सरपंच कार्यकर्ते, सामान्य जनता यांचा खुपमोठा बोलाचा वाटा आहे.

अशुध्द पाणी पिल्याने मनुष्याला किती व कोणते आजार होतात हे आपम डॉक्टरांना विचारा अथवा अनुभवलेही असेल त्या करीता मी पारनेर शहरासह इतर सुमारे २५-३० गावांना पिण्याचे शुध्दपाणी देण्याची पाणी योजना सर्वेक्षण केलेली आहे त्यात काही बदल होऊ शकतात यातुन माता-भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कायम स्वरुपी उतरू शकतो.

तालुक्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी जे शिक्षणासाठी शहरात येतात त्याच्यासाठीही एस.टी साठी टपावर बसुन येऊन मंत्र्याना अडवून, रस्ता रोको करून एस. टी ची सोय करण्याचा प्रयत्न केला शासकिय रुग्णालय, खाजगी रुग्णालय तसेच जनतेस अपघात समई अनेकांना रात्री-बेरात्री केलेली मदत हि माझी खुप मोठी जमेची बाजु आहे असे मला वाटते.

एकूणच ज्या जनता जनार्धनांच्या जीवावर व आशिर्वादावर ही पदे मिळाली त्याची सदैव जाणीव माझ्या मनात आहे आणी सदैव राहील याची मी खात्री देतो. एकंदरीत काम करताना प्राथमिक शाळेतील विद्यार्थी माध्यमिक उच्च  माध्यमिक शाळेतील विद्यार्थी शेतकरी व सर्वसामान्य जनता यांच्या हाकेला अगदी २४ तास ३६५ दिवस सेवा यासाठी संदेश कार्लेला आपला आशिर्वाद हवा हा

मूलमंत्र घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत जाणीव ठेवीण याची मी हमी देतो. कारण ‘तुमचा विश्वास हाच माझा श्वास ‘ हे मी समजतो.

जय महाराष्ट्र….!

आपला माणुस आपल्यासाठी…

अ.नं. ८

उमेदवाराचे नाव- संदेश तुकाराम कार्ले

अपक्ष उमेदवार चिन्ह – प्रेशर कुकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *