राणी लंके यांच्या प्रचारासाठी नगर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटले

राणीताई लंके यांच्या प्रचारासाठी नगर तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते एकवटले

२० गावांमध्ये काढला झंझावाती प्रचार दौरा

नगर तालुका (प्रतिनिधी) – पारनेर-नगर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.राणीताई निलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर तालुक्यातील गावागावातील पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटले असून रविवारी (दि.१०) २० गावांमध्ये त्यांनी झंझावाती प्रचार दौरा केला. प्रचारासाठी दिवस कमी राहिल्याने या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नगर तालुक्यातील प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. 

सारोळा कासार येथील हनुमान मंदिरात नारळ वाढवून या प्रचार दौऱ्याचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर घोसपुरी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, देऊळगाव सिद्धी, बाबुर्डी, घुमट, खडकी, खंडाळा, अरणगाव, सोनेवाडी, अकोळनेर, भोरवाडी, कामरगाव, चास, भोयरे खुर्द, भोयरे पठार, पिंपळगाव कौडा, हिवरे बाजार, टाकळी खातगाव, निमगाव वाघा, नेप्ती या गावांमध्ये हा प्रचार दौरा काढण्यात आला. 

या प्रचार दौऱ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, नगर तालुका दुध संघाचे चेअरमन गोराभाऊ काळे, संचालक राजाराम धामणे, भाऊसाहेब काळे, गजानन पुंड, सुनिल ठोकळ, संतोष खोबरे, दत्ता काळे, आदिनाथ गायकवाड, सुनिल कोठुळे, प्रवीण कोठुळे, जनार्धन माने, अंकुश गिरवले, संतोष इंगळे, आण्णा चोभे, वैभव खेंगट, दीपक कार्ले, राजेंद्र गावखरे, डॉ.गवळी, अशोक शिंदे, बाबासाहेब टकले, पप्पू उरमुडे, राजेंद्र आंबेकर, देवराम कोल्हे, सचिन ठाणगे, भाऊसाहेब गवळी, आण्णासाहेब मोटे, भास्कर, भोर, अनिल ढवळे, राहुल जाधव, वसंत ठोकळ, रावसाहेब साठे, गणेश साठे, तुकाराम कातोरे, अविनाश जाधव, बाळासाहेब शेळके, संजय गारुडकर, भगवान भोर, आदेश शेळके, सोनू जाधव, सीताराम गारुडकर, शरद जाधव, विजय जाधव, सविता मेहेत्रे, तुषार सुंबे, सचिन दळवी, विठ्ठलराव दळवी, मोहन सुपेकर, विकास कार्ले यांच्या सह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

या प्रचार दौऱ्यास गावागावात मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत स्वागत केले, आता सर्व गावांमधील पदाधिकारी त्यांच्याच गावात वाड्या वस्त्यांवर प्रचार करणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *