सकल मातंग समाजाचा राणीलंके यांना पाठींबा

सकल मातंग समाजाचा राणी लंके यांना पाठिंबा 

खा. नीलेश लंके यांच्या कामावर प्रेरीत होऊन घेतला निर्णय 

पारनेर : प्रतिनिधी 

      पारनेर-नगर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी नीलेश लंके यांना सकल मातंग समाजाच्या वतीने रविवारी जाहिर पाठिंबा देण्यात आला. खा. नीलेश लंके यांच्या विकास व सामाजिक कामांवर प्रेरीत होउन आम्ही हा निर्णय घेतल्याचे समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

     सकल मातंग समाजाचे पारनेर तालुकाध्यक्ष  रामदास साळवे,अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे तालुकाध्यक्ष नामदेवराव चांदणे, रामदास वायदंडे,  मनेष वैराळ, राजू वैराळ, महादू मेंगाळ, बहुजन संघटनेचे संभाजीराव गायकवाड, राजू मेंगाळ, गेणभाऊ मेंगाळ, महादू शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. 

     यासंदर्भात सकल मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, खासदार नीलेश लंके यांनी सामाजिक तसेच विकासाची मोठी कामे केली असून २४ तास ३६५ दिवस उपलब्ध असणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा नावलौकीक  आहे. कोरोना संकटात अवघे जग  भितीच्या सावटाखाली  असताना खा. नीलेश लंके यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हजारो  रूग्णांना मोफत औषधोपचार दिले. त्यांचा आधार दिल्याने एकाही रूग्णाचा त्यांच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात मृत्यू झाला नाही. कोरोना रूग्णांसाठी देवदूत ठरलेल्या खा. लंके यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरीकासाठी आरोग्यासह त्यांच्या  विविध वयक्तिक कामांमध्ये मदत  केलेली  आहे. त्यांचे  हे काम आमच्यासाठी प्रभावी असून या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी  करणाऱ्या खा. नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना आम्ही जाहिर पाठींबा देत असल्याचे सांगण्यात आले.

▪️चौकट

अण्णाभाऊंचे स्मारक हवे

आमच्या समाजासाठी तसेच गोरगरीब, वंचित समाजासाठी खा नीलेश लंके यांनी भरीव कामे केली आहेत. मदतीचा हात दिला आहे. खा. लंके यांनी अण्णाभाऊ साठे  यांच्या स्मारकाची उभारणी करावी आमची मागणी असून खा. लंके ही मागणी पुर्ण करतील. समाजाच्या  अनेक बांधवांना घरकुले मंजुर झालेली असून त्यांना जागा नसल्याने समाज  बांधवांना जागा उपलब्ध करून  करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या बांधवांच्या मागण्यांचा  सकारात्मक विचार  करण्याची ग्वाही यावेळी खा. लंके यांच्या वतीने देण्यात आले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *