शेतकरी संघटनेचा संदेश कार्ले यांना पाठींबा

संदेश कार्ले यांना मोठा दिलासा

शेतकरी संघटनेने केला पाठिंंबा जाहीर | प्रचारात होणार सक्रिय

अ. नगर –

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने पारनेर विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यातच महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी अपक्ष विधानसभेच्या रिंगणात उडी मारल्याने खासदार नीलेश लंके यांना मोठा झटका बसला असल्याचे बोलले जात आहे. त्यातच अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांना शेतकरी संघटनेने पाठिंबा जाहीर केला असून कार्ले यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

  पारनेर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राणीताई लंके, महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते व अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांच्यातच लढत होईल असे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. प्रचारासाठी अवघ्या 10-12 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. पारनेर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राणीताई लंके, महायुतीकडून काशिनाथ दाते तर अपक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, माजी आमदार विजय औटी, माजी नगराध्यक्ष विजय औटी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या पाच उमेदवारांमध्ये येथील लढत होणार असली तरी प्रामुख्याने लंके-दाते-कार्ले यांच्यातच खरी लढत  होईल असे नागरिकांमधून बोलले जातेय.

दरम्यान नगर तालुक्यातील एक लाख सात हजार मते पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात आहेत. संदेश कार्ले हे तालुक्यातीलच आहेत. जिल्हा परिषद सदस्य पद व पंचायत समितीचे सभापती पद कार्ले यांनी भुषविले आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये कार्ले यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तब्बल दहा वर्ष घोसपुरी पाणी योजना यशस्वीपणे चालवून 18 गावांची तहान भागविली आहे. याचा कार्ले यांना चांगला फायदा होवू शकतो. त्यातच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वारंवार उठवलेला आवाज, सर्वसामान्यांच्या सुख दुःखात 24 तास उपलब्ध असणारा व्यक्ती म्हणून संदेश कार्ले यांच्याकडे पाहिले जाते.

*काय म्हटलेय शेतकरी संघटनेच्या पत्रात..*

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदेश तूकाराम कार्ले यांची शेतकऱ्यांप्रती असलेली न्याय देण्याची भूमिका, प्रसंगी आंदोलनाची तयारी या सर्व गोष्टी पाहून शेतकरी संघटनेच्यावतीने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष युवा आघाडी शेतकरी संघटनेचे बच्चू बाबासाहेब मोढवे यांनी म्हटले आहे. तसेच पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांना, शेतकऱ्यांना व शेत मजुरांना अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांच्या गावोगावी प्रचारासाठी मदत करावी अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी प्रकाश कुलट उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *