अकोळनेर येथे रंगला दहीहंडी उत्सव
अहमदनगर – शहरी भागात होणाऱ्या दहीहंडी उत्सव ग्रामीण भागातील नागरिंकाना पहावयास मिळावा यासाठी अकोळनेर चे सरपंच प्रतिक शेळके यांनी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई येथील गोंविदा पथकाला निमत्रीत केले.
अकोळनेर ( ता. नगर ) येथे गोपाळ काल्या निमित्त सरपंच प्रतिकशेळके यांनी दहीहंडी उत्सव व सांस्कृतिक गाण्याचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दहीहंडी उत्सव भरवण्याचे हे चौथे वर्ष आहे. प्रत्येक वर्षा दहीहंडी उत्सव भरून नागरिकाना एक वेगळाच आनंद देण्याचे काम या माध्यमातून केले जाते या गोंविदा पथकाने सहा थर रचवत दहीहंडी फोडली १ लाख११ हतार एकशेअकरा रुपये व मानाची गदा पटकाविली. या सोहळ्यासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, उद्योजक सचिन कोतकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले, भाजप तालुकाध्यक्ष दिपक कार्ले, दत्ता पवार , सुनिल जाधव,मनोज कोतकर, जालींदर कोतकर, अंकुश शेळके, भाऊ भोर, रमेश जाधव,राजेंद्र शेळके, बापू मेहत्रे, मोहन गहीले, धनजय जाधव, सुनिल फाटक, रामभाऊ धाडगे, रेवणनाथ चोभे, प्रसाद आंधळे, बाली बांगरे, राहुल जाधव, लहू भालेकर, महेश कोठुळे, गजानन पुंड, राहुल आढाव, अर्जुन सोनवणे, नारायणराऊत, बाळासाहेब मगर, रघुनाथ हजारे, गोरख जाधव, गणेश भोर, रावसाहेब गारुडकर सुधीर शिंदे सिने अभिनेत्री
अभिनेत्री अक्षदा वाल्हेकर, नमिता पाटील, पूनम कुडाळकर, अर्चना जावळेकर, सीमा पुणेकर
उपस्थित होत्या. या वेळी नागरिकांना मनोरंजनासाठी मराठी हिंदी गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.