पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी जी परंपरा निर्माण केली ती कायम ठेवण्याचे काम खासदार डॉ. सुजय विखे पाटील करत आहे. – धनश्रीताई विखे पाटील

 पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी जी परंपरा निर्माण केली ती कायम ठेवण्याचे काम खासदार डॉ. सुजय विखे पाटील करत आहे. – धनश्रीताई विखे पाटील

अहमदनगर -नगर तालुक्यातील आरोग्य ग्राम जखणगांव येथे संक्रांत पर्वानिमित्त प्राथमिक आरोग्य ऊपकेंद्र जखणगांव मार्फत हळदीकुंकू कार्यक्रम व उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे निमित्ताने धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा क्रिडा कार्यालय मार्फत जखणगांव येथे देण्यात आलेल्या इनडोअर जिमचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.
संक्रांत सणाचे पर्व  सुर्याच्या मकर राशीत प्रवेशानिमित्त साजरे केले जाते. जखणगांव येथे आज संक्रात निमित्त सार्वजनिक हळदीकुंकू, तिळगुळ व उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्रियांचे आरोग्य अबाधीत रहावे यासाठी नगरमधील प्रसिद्ध स्तनविकार तज्ञ डॉ तेजश्री जुनागडे यांचे स्तनाचे विकार व त्यावरील उपचार याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना धनश्रीताई विखे म्हणाल्या ” विखे पाटील परिवार बहुजन समाजाला आपले कुटुंब मानतो..जखणगांव मध्यें यआ हळदीकुंकू कार्यक्रमास सर्व जातीधर्माच्या महिलांनी सहभाग घेऊन ईतर गावांनी व समाजाने एक आदर्श घ्यावा असे कार्य केले आहे.उपस्थित महिलांनी पारंपरिक पद्धतीने  उखाणे घेऊन आनंदी वातावरण निर्माण झाले.यावेळी गावात चालू असलेल्या विविध विकास कामांची माहिती 
आरोग्यग्राम जखणगांवचे सरपंच डॉ. सुनिल गंधे यांनी दिली तर गावात आवश्यक असणार्या गोष्टींची मागणी केली .कार्यक्रमास नगर तालुका पोलीस अधिकारी प्रल्हाद गीते, डाँ. तेजश्री जुनागडे ,कालींदी केसकर,ग्रामसेवक प्रविण पानसंबळ,तंटामुक्ती अध्यक्ष मुजीब पटेल, पोलीस पाटील रमेश आंग्रे,माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, ग्रामपंचायत सदस्य प्रगती कर्डिले, स्नेहा काळे, नवनाथ वाळके, सुनिता चाबुकस्वार, अल्ताफ शेख,सुरेश कार्ले, गोरख कर्डिले,नाना नवले, सुनिता शहाणे, डाँ. सुयश गंधे, शिक्षिका अर्चना शेळके, निर्गुणा कापसे, डाँ. किर्ती गंधे, परविन शेख,रजनीताई गंधे, डाँ. रूषाली झावरे ,डाँ. सानिका गंधे, जनाबाई भीसे,रेश्मा शेख यांचे सह असंख्य  महिला,ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.सर्व उपस्थित महिलांना कृषी विभागामार्फत पिकांना व फळझाडांना पोषक खते व पौष्टीक न्युट्रीयंट्स वाटण्यात आली.
या इनडोअर जिममध्ये पाच लाख रूपयांचे साहित्य ऊपलब्ध झाले असुन ही जिम ८ तास पुरूषांसाठी व ४ तास स्रियांसाठी वापरण्यात येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *