अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुमन सप्रे व सचिव पदी स्मिता औटी यांची निवड
अहमदनगर -अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुमन सप्रे उपाध्यक्षपदी आशा पवार, सचिव पदी स्मिता औटी यांची बिनविरोध निवड झाली.
संस्थेच्या कार्यालयात यांच्या अध्यक्षतेखाली हि निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सुमन सप्रे,सचिव पदी स्मिता औटी, उपाध्यक्ष पदासाठी आशा पवार यांची निवड बिनविरोध झाली. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस पतसंस्थेचे कार्यकारी संचालक ताराबाई माळवदे, सुलभा जाधव, अंजना ठाणगे, अनिता गोरे, कालिंदा शिंदे, नसीमबानु शेख, विदया दुसुगे, आशा दारकुंडे, स्मिता औटी, राजश्री कोल्हे, कविता कापसे रुपाली जाधव, विजया म्हस्के, नैना चाबुकस्वार, शैलजा उदमले, शोभा शेवाळे, संस्थेचे कर्मचारी वरिष्ठ लिपिक अल्ताफ शेख, कनिष्ठ लिपिक गौरी चवक उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुमन सप्रे म्हणाल्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मुलांचे शिक्षण व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याना या पतसंस्थेचे सभासद करून घेण्यातचे त्यांनी सांगितले. पतसंस्थे जास्तीत जास्त कर्ज वितरण व ठेवी कश्या येतील यासाठी प्रयत्न करून पतसंस्था नावारूपाला आणली जाईल असे त्यांनी सांगितले.