नगर कल्याण महामार्गावर हिंगणगाव जवळ अपघात एक जण जागीच ठार
नगर कल्याण महामार्गावर हिंगणगाव जवळ अपघात एक जण जागीच ठार नगर कल्याण महामार्गावर एसटी व दुचाकीची आज सकाळी साडेदहा वाजता झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे. सविस्तर नगर कल्याण महामार्गावर हिंगणगाव फाटा ( ता. नगर ) परीसरातील सोनवणे दाते पेट्रोल पंपा समोर पारनेरवरून नगर कडे जाणारी एसटी महामंडळाची बस व दुचाकीस्वार नगर वरून धोत्रे येथे जाणाऱ्या दुचाकी स्वार यांची सुमारासमोर जोराची धडक झाली यामध्ये दुचाकीस्वार राहुल संजय खोमणे ( वय -३० ) राहणार धोत्रे ( ता. पारनेर )हा युवक जागीच ठार झाला. एसटी चा वेग जास्त असल्यामुळे दुचाकी बसने शंभर फुटापर्यत ओढत नेली. सदर तरुणाला पंचनामा करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नेले . ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला असल्याची या वेळी प्रवाशानी सांगीतले.तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे