पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींना जिवंत जाळले

 पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींना जिवंत जाळले

नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील घटना
अहमदनगर : पिंपळगाव लांडगा ( ता. नगर ) येथील  सुनील लांडगे याने त्याची पत्नी लिलाबाई आणि दोन मुलीना रॉकेल टाकून घरात जिवंत जाळले.  ही घटना सोमवारी सकाळी नऊ वाजता घडली.
  दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केले.
 या घटनेत पत्नी लिलाबाई ( २६), मुलगी साक्षी (१४वर्षे)  खुशी (९ महिने) या तिघांचा जळून मृत्यू झाला.
जे घर पेटवून दिले ते पत्र्याचे होते. ते जळून खाक झाले. आधीच उन्हाचा तडाखा व भडकलेली आग, तापलेले पत्रे अद्याप मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मात्र दुपारपर्यंत हे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. 
दरम्यान या घटनेमुळे पिंपळगाव सह नगर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.. सुनील लांडगे याला  पोलिसांनी ताब्यात घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *