शिक्षक बँकेचे कार्य कौतुकास्पद-श्री. रमेश कासार

 शिक्षक बँकेचे कार्य कौतुकास्पद-श्री. रमेश कासार

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक नगर तालुका शाखा आयोजित दादासाहेब दोंदे व भा.दा.पाटील गुणवंत शिक्षक व गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण कार्यक्रम सन 2023-24 काल माऊली सभागृह स्टेशन रोड अहमदनगर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुमाऊली सदिच्छा मंडळाच्या उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष  राजकुमार साळवे हे होते. आरंभी देवी सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे लेखा अधिकारी रमेश कासार हे होते .प्रास्ताविक शिक्षक बँकेचे संचालक  महेश भणभने यांनी केले. यावेळी  कासार म्हणाले विद्यार्थ्यांनी नवनवीन क्षेत्रात प्राप्त केलेले यश हे चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मिळवले आहे .मिशन आपुलकी अंतर्गत जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठे काम उभे केले . त्याची निश्चित दखल जिल्हा परिषद घेत आहे. आगामी काळामध्ये सुद्धा अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक हा राज्यामध्ये आदर्शवत काम उभे करतील. प्राथमिक शिक्षक बँकेने शिक्षकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शिक्षक बँक आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत आहे. बँकेमुळेच प्रत्येकाचे घर उभे रहात आहे. अध्यक्षपदावरून बोलताना  राजकुमार साळवे यांनी आपल्या विनोदी आणि खुमासदार शैलीत वेगवेगळे अनुभव सांगितले . राज्यातील शिक्षकांचे युवा नेते मान. बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षापासून शिक्षक बँक अतिशय सचोटीने कारभार करत आहे .यापुढील काळातही सात टक्के व्याजदर कसा करता येईल यासंदर्भात विविध योजना राबवत आहे.विद्यार्थी हा आपला देव असून त्याची सेवा हीच आपल्याला सुख आणि समाधान मिळवून देईल . आचार्य दोंदे श्री प्र .के. अत्रे व डॉ . बाबासाहेब आंबेडकर या तीन आदरणीय व्यक्तिमत्त्वांनी देशातील शिक्षकांना मोठे बळ दिले आहे.विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी यश प्राप्त करीत आहेत. मिशन स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा शिक्षकांनी चांगले काम केले आहे .माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व सन्माननीय शिक्षणाधिकारी यांच्या आवाहनास सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे यावेळी ते म्हणाले. व्यासपीठावर राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट बँकेच्या व्हाईस चेअरमन निर्गुणा कापसे,जिल्हा संघाचे कार्यकारी अध्यक्ष श्री नारायण पिसे,माजी चेअरमन  नवनाथ तोडमल, राज्य उपाध्यक्ष  विजय ठाणगे, विकास मंडळाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष  भास्कर कराळे, राजेंद्र ठोकळ , बाळासाहेब कापसे, बाबासाहेब आव्हाड,  सचिन नाबगे, बाळासाहेब चाबुकस्वार, संतोष आंबेकर, संदीप ठाणगे ,श प्रतिभा साठे , राजेंद्र निमसे  विजय नरवडे ,विस्तार अधिकारी  विलास मुनोत उपस्थित होते. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा फेटा व ट्रॉफी देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर सत्कार करण्यात आला. तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष  गहिनीनाथ पिंपळे व गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष  आदिनाथ सातपुते यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर सूत्रसंचालन  नितीन पंडित यांनी केले कार्यक्रमाचे आभार नगर तालुका महिला आघाडीचे अध्यक्ष  वंदना भालसिंग  यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *