नीलेश लंके जिल्ह्यात परिवर्तन घडविणार

 नीलेश लंके जिल्ह्यात परिवर्तन घडविणार

ॲड. प्रताप ढाकणे यांचा विश्वास
टाकळी मानूर : प्रतिनिधी 
   सर्वसामान्य कुटुंबातील आमदार नीलेश लंके यांनी संपूर्ण नगर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील जनतेची मने जिंकली असून सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त करतानाच नगर जिल्ह्याच्या राजकारणात ते परिवर्तन घडवतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्रताप ढाकणे यांनी व्यक्त केला
       टाकळी मानुर येथे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ टाकळीमानुर गणाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणातील तसेच अनेक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वच कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये  नीलेश लंके यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊ अशी सर्वांनी यावेळी ग्वाही दिली. 
        सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ही लढाई धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती आहे.  सर्वसामान्य व्यक्ती म्हणून नीलेश लंके यांच्याकडे सर्वत्र पाहिले जाते. म्हणून  आपणही या विचाराच्या लढाईमध्ये सहभागी होऊन  लंके यांना मोठे मताधिक्य द्यावे असे ढाकणे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या.
         यावेळी  बोलताना प्रताप ढाकणे म्हणाले की २४ तास ३६५ दिवस सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी खंबीर असलेले लोकप्रतिनिधी अशी नीलेश लंके यांची ख्याती जगात निर्माण झाली आहे.
कोरोना संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ३३ हजार रुग्णांना जीवदान त्यांनी दिले.मुख्यमंत्री सहायता निधीच्या बाबतीत राज्यातील २८८ आमदारांमध्ये पहिल्या क्रमांकाचा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. केवळ स्वतःच्या मतदारसंघाची काळजी न करता संपूर्ण राज्यातील पीडित रुग्णांना न्याय देण्याची भूमिका लंके यांनी घेतली त्यांचे हेच काम लोकसभा मतदारसंघातील जनतेला भावते आहे असे ढाकणे म्हले.
       
     ढाकणे पुढे म्हणाले, मतदारसंघातील दहा पैकी आठ लोक नीलेशभाऊंचे नाव घेत आहेत, यातच त्यांचा मोठा विजय निश्चित आहे असा विश्वास ढाकणे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *