शिष्यवृती परीक्षेत कार्मेल कॉन्व्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची नेत्रदिपक

शिष्यवृती परीक्षेत कार्मेल कॉन्व्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची नेत्रदिपक कामगिरी.

अहिल्यानगर -महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा (ईयत्ता पाचवी व ईयत्ता आठवी) फेब्रुवारी- २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत कार्मेल कॉन्व्हेट हायस्कूल, भूषणनगर, केडगाव, अहिल्यानगर येथील चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश  संपादित करत नेत्रदीपक कामगिरी केली आहे

विद्यालयाच्या १) शौर्य सोमनाथ मोटे- (ईयत्ता पाचवी) – ७०.४६% टक्के गुण

२ ) रोणित तुषार ठुबे – (ईयत्ता आठवी) ८०.४० % गुण

३) साईराज संदिप जाधव (ईयत्ता आठवी) ७९.७२% गुण

४) आयुष चंद्रकांत पालवे(ईयत्ता आठवी) ७४.३२% गुण

प्राप्त करत विद्यालयाच्या यशाची परंपरा सालाबाद प्रमाणे अबादित राखत शिष्यवृत्ती मिळवली आहे . कार्मेल कॉन्व्हेट हायस्कूल नेहमीच शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असते. सदर सर्व उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या सौ. सुनिता पाटिल, सौ. स्नेहल शिंदे, सौ. सुष्मा कांबळे . शेरॉन मनतोडे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले

विदयालयाच्या व्यवस्थापिका सिस्टर अलफोन्सा, प्राचार्या सिस्टर लिजी पॉल, समन्वयक मनिषा साळवी यांनी या  यशस्वी विद्यार्थ्याचे  अभिनंदन करुन पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *