श्री आबासाहेब सोनवणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर*

श्री आबासाहेब सोनवणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर*

*अहिल्यानगर : हिंगणगाव तालुका अहिल्यानगर येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच तसेच सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी अध्यक्ष श्री आबासाहेब सोनवणे यांना अहिल्यादेवी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे,अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अशोक गोरड व कार्याध्यक्ष श्री महादेव महानोर यांनी दिली आहे.*

*एडी फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर “महाराष्ट्र रत्न” गौरव या राज्यस्तरीय पुरस्कार* *सोहळा वितरणाचे आयोजन रविवार दि- 25 मे 2025 रोजी सकाळी दहा वाजता, निर्मिती लॉन्स, विजापूर रोड सोलापूर येथे पार पडणार आहे.*

*श्री आबासाहेब सोनवणे यांना गेली 25 वर्षे पंचायत राज व्यवस्था मध्ये सरपंच व सदस्य या माध्यमातून कृषी, जलसंधारण, पंचायत राज व्यवस्था बळकटीकरण, दुष्काळ मुक्त गावाची ओळख पुसून पाणीदार हिंगणगाव ओळख निर्माण केल्याबद्दल, गावाशी जोडणारे सर्व रस्ते मजबुतीकरण,डांबरीकरण करणे शेतपानंद शिवार रस्ते मुक्त करून वहिवाटीस खुले करणे,गावांतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण,पेविंग ब्लॉक बसवणे,जलजीवन मिशन अंतर्गत पेयजल योजना राबवणे,गावातील प्राथमिक शाळा खोल्यांचे आरसीसी बांधकाम,पेविंग ब्लॉक,पशुवैद्यकीय दवाखाना इमारत,सुसज्ज असे अमरधाम वृक्षारोपण,न्यू इंग्लिश स्कूल उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेले अत्याधुनिक सुविधायुक्त हायस्कूल,इमारत,क्रीडांगण इत्यादी, बंधारे खोलीकरण इत्यादी कामे करून गावचा चेहरा मोहरा बदलणारे,  कोरोना काळात झोकून काम करून आरोग्याच्या सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे, आरोग्य दूत, सांगली सातारा पूरग्रस्तांना धान्य,कपडे,किराणा इत्यादी उपयोगी साहित्य पुरवून मदत करणारे व सामाजिक कार्यासाठी वाहून घेण्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.*

*या कार्यक्रमाचे अध्यक्ष जत विधानसभा मतदारसंघाचे मा.आमदार प्रकाश अण्णा शेंडगे हे असणार आहेत.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ नितीन वाघमोडे आयकर आयुक्त पुणे,मा. डॉ. सचिन मोटे आयकर आयुक्त मुंबई,सौ. रुक्मिणी ताई गलांडे सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे,श्री राम मांडूरले सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे,उद्घाटक मा. अनिल भीमराव जाहीर तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे,आहेत. विशेष आकर्षण सौ श्वेता परदेशी मिसेस इंडिया 2022,(इंटरनॅशनल मॉडेल) श्रीमती प्राजक्ता मालुंजकर रिल स्टार.*

*सत्कारमूर्ती आमदार उत्तमराव जानकर माळशिरस विधानसभा,श्री आमदार बाबासाहेब देशमुख सांगोला विधानसभा,मा.आमदार नारायण आबा पाटील करमाळा विधानसभा मतदारसंघ आहेत.*

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री आबासाहेब सोनवणे यांचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *